Question शाडू मातीचे महत्व
Answerमाती ही निर्सगाकडून मिळते. अशा मातीची मूर्ती करुन मनोभावे पूजल्यानंतर ती नदी, तलाव, समुद्र यांमध्ये विर्सजित केल्यावर पुन्हा निर्सगाला मिळते.

पुराणात सांगितल्याप्रमाणे श्रीगणेशाची निर्मिती पार्वती मातेच्या मळापासून झाली आहे; म्हणजेच मातीपासून झालेली असल्याने मातीमध्ये निर्माण केलेल्या मूर्तीमध्ये गणेशतत्व अधिक आकृष्ठ होतेअशा मूर्तीच्या पूजनाने अधिक लाभ होतो.

त्यामुळे माती सोडून गोळ्या, बिस्किटे, बाटल्या मसाल्याची पाकिटे अशा कोणत्याही घटकांनी गणेश मूर्ती घडवू नये. ही विनंती.

Question सात्विक गणेश माहिती
Answer

 • सात्विक गणेश मूर्ती ही सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि सनातन संस्थेच्या कला विभागातील मूर्तीकार श्री. गुरुदास खांडेपारकर यांच्या मार्गदर्शनानुसार बनवली आहे.
 • मुद्गल पुराण आणि श्रीगणेश अथर्वशीर्ष यातील गणपतिच्या वर्णनानुसार ही मूर्ती बनविण्याचा प्रयत्न केला आहे.
 • शरीर शास्त्रानुसार या मूर्तीच्या अवयवांकडे पाहिल्यास ते अवयव अधिक सजीव वाटतात. उदाहात, पाय इत्यादी.
 • मुद्गल पुराण आणि श्रीगणेश अथर्वशीर्ष यातील गणपतिच्या वर्णनानुसार ही मूर्ती तयार केल्यामुळे ती अधिक सात्विक वाटते. अशी मूर्ती पूजल्यामुळे पूजकाला त्याचा लाभ अधिक होतो.

Question शाडू माती आणि प्लास्टरची मूर्ती यांतील फरक कसा ओळखावा?
Answer

 • शाडू मातीची मूर्ती ही प्लास्टरच्या मूर्तीपेक्षा वजनाने जड असते.
 • शाडू मातीच्या मूर्तीच्या पाटाला धार नसते तर प्लास्टरच्या मूर्तीच्या पाटाला धार असते.
 • शाडू मूर्ती हाताने वाजवून पाहिली तर त्याचा आवाज दबका असतो तर प्लास्टरच्या मूर्तीचा आवाज मोकळा आणि अधिक (खुला) असतो.

Question पर्यावरण पूरक मूर्ती
Answer

 • शाडू माती ही निर्सगाकडून आलेली असल्याने त्याने पर्यावरणाला हानी पोहचत नाही.
 • शाडू मातीच्या मूर्तीमध्ये घातक रंग वापरले जात नाहीत.

Question कागदी लगदा मूर्ती
Answerकागद कुजवून या मूर्ती केल्या जातात. कागदी लगद्याच्या मूर्तीमध्ये मूर्ती घडण्यासाठी जे घटक वापरतात त्यामुळे आणि कागदावरील शाईमुळे मूर्ती विर्सजनानंतर पाण्यामध्ये मिथेन सारखा घातक वायू निर्माण होतो. कागदाचे छोटेछोटे कण माशांच्या कल्ल्यांमध्ये जावून त्यांची जीवितहानी होते. त्यामुळे अशाप्रकारची मूर्ती पर्यावरणास अतिशय घातक ठरते.
Question शाडू मातीची मूर्ती महाग का असते ?
Answer

 • मूर्तीकाराच्या दृष्टिने अभ्यासल्यास एका कारागिराकडून दिवसाला प्लास्टरच्या ४० ते ६० मूर्ती होऊ शकतात.
 • प्लास्टरच्या मूर्तीच्या तुलनेत शाडू मातीची मूर्ती वाळण्यासाठी चौपट वेळ लागतो.

Question मातीच्या मूर्तीमध्ये विविधता नसते.
Answerपांरपारिक मातीच्या मूर्ती सोबतच श्री गणेश कला केंद्राने कारागिरांना प्रोत्साहन देऊन गेल्या काही वर्षात विविध प्रकारच्या मातीच्या मूर्तीही उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी अवश्य आपल्या केंद्राला भेट द्यावी.
Question मातीच्या मूर्तीमध्ये सुबकता कमी असते.
Answerसर्वसामान्य ग्राहकांना प्लास्टरची मूर्ती ही मातीच्या मूतीच्या तुलनेत अधिक सुबक वाटतेप्रत्यक्षात कोणतीही प्लास्टरची मूर्ती बनण्याअगोदर ती मातीतच बनवावी लागते, आणि मग त्याचा साचा पडतो. त्यामुळे अशा प्रकारच्या सुबक मूर्ती आपण श्री गणेश कला केंद्रातर्फे उपलब्ध करत आहोत.
Question गणेशाची मूर्ती कशी असावी / नसावी.
Answerश्री गणेश हे आपले आराध्य दैवत असल्याने आपल्या धर्मग्रथांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे श्री गणेशाची मूर्ती असावी. ती विविध संतांच्या अथवा राष्ट्रपुरुषांच्या रुपामध्ये किंवा अन्य देवतांच्या रुपामध्ये बनवणे हे एकप्रकारे गणरायाचा अवमान केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी अन्य रुपातील गणेश मूर्ती खरेदी करु नये. ही विनंती.