प्रत्येक वर्षी चातुर्मास सुरु होताच सणांचे वेध लागतात. त्यातच भाद्रपदातील गणेशोत्सवाची प्रत्येकजण आतूरतेने वाट पाहातो. श्रीगणेशाचे आगमन होणार म्हणून लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेजण आनंदी असतात. गणेशभक्तांचा हाच आनंद द्विगुणित व्हावा यासाठी सर्वात महत्वाचे काही असेल तर ते म्हणजे श्रीगणेशमूर्ती !

याचसाठी श्री गणेश कला केंद्र वर्ष २००७ पासून मूर्ती उत्पादन करण्यात अग्रेसर आहे. दरवर्षी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गणेश मूर्ती निर्मितीचा मुहूर्त केला जातो.

‘धर्मपालन: इति पर्यावरणस्य रक्षणम्।’ अर्थात धर्माचे पालन करणे हेच खर्‍या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण करणे आहे. आपल्या धर्मामध्ये सण साजरे करतांना पर्यावरणाचा विचार केलेला दिसतो.

म्हणूनच श्रीगणेशोत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा केला तर पर्यावरणाचे रक्षण तर होईलच; याचबरोबर संवर्धनही होईल हे सर्व गणेशभक्तांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणूनच केवळ आणि केवळ शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे उत्पादन श्रीगणेश कला केंद्राच्या वतीने करण्यात येते.

१. हे करत असतांना गणेशमूर्ती योग्य दरात आणि मुबलक प्रमाणात समाजात पोहोचवण्याची पुरेपूर काळजी आम्ही घेत आहोत.

२. याचबरोबर गणेशभक्तांची श्रध्दा असलेल्या अनेक सुप्रसिद्ध आणि पारंपारिक गणेशमूर्तींच्या प्रतिकृती शाडू मातीमध्ये घडवलेल्या आहेत.

शाडू मातीच्या मूर्ती घडवणार्‍या कलाकारांना प्रोत्साहन !

काळानुरूप शाडू मातीचे गणपती बनवण्याची कला कमी होत चालली आहे. त्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी गावांगावांतील कारागिरांना एकत्र करून प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तींप्रमाणे शाडू मातीमध्ये सुद्धा सुबक मूर्ती देण्याचा प्रयत्न श्री गणेश कला केंद्र करत आहे. श्रीगणरायाच्या कृपेने आणि ग्राहकांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात गणेशमूर्ती पोहोचवण्याचे कार्य श्री गणेश कला केंद्र करत आहे.

आता या वेबसाईटच्या माध्यमातूनही आम्ही आपल्या सेवेस येत आहोत. शास्त्रानूसार शाडू मातीच्या मूर्तीचे घराघरात पूजन व्हावे यासाठी गणरायाची सेवा करण्याची उत्कटता, प्रामाणिक वचनबद्धता असलेल्या सर्वांचे आम्ही स्वागत करत आहोत..

आपल्या सर्वांकडून शास्त्र समजून घेऊन गणेशोत्सव साजरा केला जावा, अशी श्रीगणरायाच्या चरणी प्रार्थना करतो.